बातमी

मुरगुड विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने मिळाला जुन्या आठवणीनां उजाळा

मुरगुड (शशी दरेकर) : सन 1983/84 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मेळावा आयोजित केलेला होता . सदर मेळाव्या करिता त्यांनी आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आमंत्रित केलेले होते. इथून पुढे दरवर्षी असा स्नेहमेळा घेण्याचे त्यांनी यावेळी निश्चित केले.

येथील रणवरे हॉलमध्ये सकाळी सर्व विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक एकत्रित जमा झाले.
सर्वप्रथम दिवंगत शिक्षक, दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे स्थब्धता पाळण्यात आली.
त्यानंतर उपस्थित मान्यवर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .

शिक्षकांच्या सत्कारानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले नाव आपण सध्या काम करत असलेले ठिकाण आपली कौटुंबिक प्रगती आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वसाधारण साठ विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते . त्यांनी आपला परिचय व भावना व्यक्त केल्या तसेच उपस्थित असणाऱ्या शिक्षकांच्या बद्दल गौरव उद्गार काढले.
काही विद्यार्थ्यांनी त्यावेळी शिक्षकानींआपल्याला कशा कशा शिक्षा दिल्या याचीही दिलखुलास कबुली दिली. आणि सभागृह हास्य कल्लोळात डुंबून गेला .
विद्यार्थ्यांच्या मनोगतनंतर उपस्थित असणाऱ्या मान्यवर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर शिक्षकांपैकी श्री चंद्रकांत माळवदे सर यांनी आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मुरगुड विद्यालयाच्या आठवणी व मुरगुड विद्यालय व शिक्षकांना तुम्ही लक्षात ठेवाल यात शंका नाही असे सांगितले. भावी जीवनात यशस्वी होण्याकरिता सतत सत्संगतीत रहा असेही त्यांनी सांगितले.

आदरणीय इंदुलकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा कधी आपणास गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यास तयार आहोत असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाला श्री गोसावी सर श्री कोरे सर यांनीही उपस्थिती दाखवून सर्वांना शुभाशीर्वाद दिले.

शेवटी स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनय कुलकर्णी यांनी केले. तर आभार श्री . सुनिल रणवरे यानीं मानले . हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी राजू फर्नांडिस , बबन बारदेस्कर , अरुण माने , प्रकाश उर्फ बेळगुंद पारिशवाडकर, राजू सावर्डेकर , जयवंत गायकवाड , बाळू भराडे , दत्तात्रय परीट , भारत भोई , चंदू बारड यानीं अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *