मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व रवळनाथ को.ऑप. हौसिंग फायनान्सचे सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ . शिवाजी होडगे यांचा रवळनाथ को – ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा शाखा निपाणी यांच्या वतीने निपाणी शाखेचे चेअरमन व्ही आर पाटील यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. होडगेनी मॉरीशसचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या निपाणी कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी निपाणी शाखेचे चेअरमन प्रा .व्ही आर. पाटील होते.
प्रारंभी प्रा. डॉ. पी. बी. शिलेदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून मॉरीशसच्या अभ्यास दौऱ्या बाबतचे उद्दीष्ट स्पष्ट करत प्रा.डॉ होडगेंची विद्यापीठीय स्थरावरील संघटनात्मक कार्यकौशल्यता आदी बाबींचा उहापोह प्रास्ताविकातून केला.
सत्काराला उत्तर देतांना प्रा.डॉ होडगेंनी प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन एम. एल. चौगुले शाखा चेअरमन व्ही. आर. पाटील संस्थेचे पदाधिकारी सर्व संचालक मंडळ अधिकारी व सेवकवृंद यांनी केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले आपला भारत देश आणि मॉरीशस यांच्यातील स्नेहसंबंध दृढ व्हावेत हा अभ्यास दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता. भारत आणि मॉरीश यांच्यातील सांस्कृतिक स्नेहसंबध या विषयावरील त्यांचा शोध निबंध सादर केल्याचे यावेळी त्यांनी सागितले.
भारत देशापासून मॉरीशस पाच हजार किलो मीटर अंतरावर आहे. विमानाने तेथे जाण्यास अंदाजे सहा तासांचा कालावधी लागतो . हा एक छोटासा पण अतिशय सुंदर असा देश आहे. येथे स्वच्छतेचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. साडेबार लाख लोकसंख्या असलेल्या या देशात एक लाख मराठी भाषिक बांधव आहेत. इथ ट्यूरीझम, औद्योगिक क्षेत्र आहे. आय टी पार्कमध्ये देशाला उपयुक्त होईल असेच शिक्षण दिले जाते. इथली वाहतूक व्यवस्था अत्यंत शिस्तबद्द पध्दतीची आहे. देशाचे क्षेत्रफळ १५० कि. मि. आहे. या देशात उस पिकविला जातो . चार सारवर कारखाने आहेत. इथली शेती यांत्रिकीकरणावर कसली जाते. भेदभाव इथे नाही. केवळ रविवारीच फक्त इथे लग्न सोहाळे होतात. डॉलर हे विनिमयाचे साधन आहे.
हिंदी महासागरावरील हे बेट मात्र इथले समुद्र किनारे स्वच्छ आणि तितकेच सुंदरही आहेत . अशा या शांत आणि सुंदर देशात जगातील लोक ट्यूरीझम करीता आकर्षिले जातात. मॉरीशस ला १९६७ साली स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीजींचं मॉरीशसच्या स्वातंत्र्यासाठी मोठ्ठं योगदान आहे. प्रा. डॉ. होडगेंनी अभ्यास दौऱ्याची इत्यंभूत माहिती दिल्याबदल प्राचार्य डॉ पी एम हेरेकर, व्ही आर पाटील आदीनी प्रसंशा करून डॉ होडगें यांना सुयश चिंतले. सरकार समारंभाला शाखा चेअरमन व्ही . आर .पाटील प्राचार्य डॉ पी. एम. हेरेकर प्रा .डॉ .पी .बी .शिलेदार श्री. पी. डी. रामनकट्टी प्राचार्य डॉ. एम . बी .कोथळे , ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी शाखाधिकारी श्री . दळवी, शाखेतील सर्व सेवकवृंद उपस्थित होते. शेवटी शाखाधिकारी श्री दळवी यांनी आभार मानले.
.