बातमी

हुपरी नगरपरिषद मार्फत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

रणदेवीवाडी (शिवाजी फडतारे) : जागतिक महिला दिन निमित्त हुपरी नगरपरिषद मार्फत सोमवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हुपरी नगरपरिषदेने दिली आहे.

सदर स्पर्धांमध्ये उखाणे, संगीत खुर्ची, टाकाऊ पासून टिकाऊ बनवणे, लिंबू चमचा स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच ‘महिला आरोग्य’ विषयावर डॉ. प्राची घुणके, सौ.सुजाता गाट यांचे व्याख्यान आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलांना भेटवस्तू, शिल्ड, प्रमाणपत्र बक्षीस मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल पाटील, मुख्याधिकारी सौ, स्नेहलता कुंभार-ढेरे, हुपरी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी वसुंधरा देशमुख, हुपरी सहा. पोलीस निरीक्षक पंकज गिरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी स्पर्धेसाठी महिलांनी सोमवार दि. २० मार्च दुपारी २ वाजेपर्यंत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *