सेवानिवृत्त शिक्षकाचा आगळा-वेगळा अपक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. हेमंत पोतदार हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त खर्चाला फाटा देत विविधी सामाजिक उपक्रम राबवत असतात यावेळी त्यांनी मुरगूडमधील जीवन शिक्षण विद्यामंदीर, कन्या विद्या मंदीर, व लिटल मास्टर गुरूकुलम् या शाळेमधील मुलानां खाऊचे वाटप केले तर ते पुर्वी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या न्यू इंग्लीश स्कूल कुरुकली आणि मांगनूर हायस्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा घेऊन विद्यार्थानां बक्षिस वितरण केले मुरगूड, कुरुकली, मांगनूर येथील सर्व शिक्षकानी स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
या स्पर्धांचे परिक्षक म्हणून मुरगूड विद्यालय मुरगूडचे श्री. टिपूगडे सरांनी काम पाहीले होते. सेवानिवृत्त शिक्षकाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.