24/09/2022
0 0
Read Time:3 Minute, 2 Second

मुरगूड ( शशी दरेकर ) :

मुरगूड,ता.११ : ऑगस्ट २०१९ पासून राज्य शासनाने जमीन खरेदी विक्रीबाबत अनेक प्रकारच्या जाचक अटी घातल्यामुळे गुंठेवारी खरेदी – विक्री व्यवहार बंद आहेत. परिणामी त्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत आहे. यासाठी शासनाने तात्काळ ही गुंठेवारी खरेदी – विक्री सुरु करावी. या मागणीचे निवेदन मुरगूडमधील जमीनधारकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना दिले निवेदन असे,महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २०१९ पासून जमीन खरेदीबाबत अनेक जाचक अटी घातलेल्या आहेत. या जाचक अटीमुळे राज्यभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा जमीन व्यवहार पूर्णतः ठप्प झाला आहे.

परिणामी सर्वसामान्य जनतेवर त्याचा फार मोठा आर्थिक परिणाम झाला आहे.विशेषतः ग्रामीण भागातील अल्पभूधारक ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी अडी – अडचणीसाठी,मुलांच्या शिक्षणासाठी, मुला – मुलींच्या लग्नासाठी व अन्य प्रापंचिक अडचणीसाठी आपल्या मालकीच्या शेती मधील कांही शेतीचे तुकडे विक्री करून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्याची आर्थिक आणीबाणीची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.अशा परिस्थितीत राज्य शासनाने घालून दिलेल्या जाचक अटीमुळे तुकडेबंदी व्यवहार शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत आहेत.यासाठी शासनाने तात्काळ गुंठेवारी व्यवहार सुरु करावेत. हा प्रश्न अधिवेशनामध्ये लक्षवेधी करुन दाद मागावी व राज्यातील जनतेला दिलासा द्यावा.अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले आहे.
प्रसंगी नगरसेवक संदिप कलकुटकी,आनंदा मांगले उपस्थित होते. या निवेदनावर दत्तात्रय मंडलिक,नवनाथ सातवेकर, रणजित भारमल,संदीप वड्ड, दत्तात्रय परीट,रणजीत सावंत, अरविंद मोरबाळे,प्रशांत शिरसेकर,संजय एकल,संतोष शिंदे,अमर चौगले,प्रवीण पाटील,जनार्दन कांबळे , अनिल आंगज, विशाल मगदूम,स्वप्नील आमते,तुषार मांगले, दिग्विजय चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, आदींच्या सह्या आहेत.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!