कागल /प्रतिनिधी : परीक्षक, नियामक व पर्यवेक्षक यांच्या भत्त्यात वाढ व्हावी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ कोल्हापूर यांना नुकतेच देण्यात आले. बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत. शिक्षकवर्ग आपले काम प्रामाणिकव अविरत पणे पार पाडत आहे. परंतु त्याचा मोबदला म्हनावा तितका दिला जात नाही.
ही शिक्षक वर्गातील शोकांतिका आहे. अनेक शिक्षक घड्याळ तासिकावर व विनाअनुदानित म्हणून कार्यरत आहेत .त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. मजुरा पेक्षा अनुदान कमी आहे. चालू वर्षी पर्यवेक्षकांना वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करावा लागतोय. हा खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

मानधन वाढीची मागणी तशी जुनीच आहे. परंतु सकारात्मक कार्यवाही कधी होणार ,असा प्रश्न शिक्षक वर्गातून उपस्थित होतो आहे. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष पीएस दुर्गी ,सचिव संजय मोरे ,सहसचिव बीके मडिवाळ यांचेसह शिक्षक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.