06/10/2022
0 0
Read Time:1 Minute, 51 Second

साके : सागर लोहार

कागल- निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाटामध्ये चालत्या कारचा स्फोट झाला. या स्फोटात कणेरी( ता करवीर) येथील अभिजित हणमंत धनवडे (वय ३१) हा तरुण जागीच ठार झाला. सदची घटना शुक्रवार ता १२ रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली. जळत असलेली कार घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली.

यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय गोर्ले दाखल झाले. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली आहे. पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली.

पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता गाडी क्रमांक (एमएच ०९ऐक्यू ३७०३) असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्या अभिजित धनवडे यांच्या मालकीची गाडी असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. घटनेची माहिती गोरंबे माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी कागल पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी तात्काळ पोहचले दरम्यान पोलिस सदर घटणेचा तपास करत आहेत.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!