बातमी

मुरगूड नगरपरिषदेचा राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते होणार गौरव

स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ मध्‍ये देशात उच्‍चतम कामगिरी

मुरगूड (शशी दरेकर) :
स्‍वच्‍छ भारत अभियान, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ मध्‍ये मुरगूड शहराने टॉप ३ मध्‍ये मानांकन मिळविले असून कचरामुक्‍त शहरामध्‍ये ५ स्‍टार मानांकन मिळविले आहे. या पुरस्‍कारामुळे मुरगूड शहराचा गौरव होणार असून या बद्दल कोल्‍हापूर जिल्‍हयाचे खासदार मा. संजयदादा मंडलिक यांनी समाधान व्‍यक्‍त केले. या कामगिरीमध्‍ये सातत्‍य ठेवुन मुरगूडचे नाव देशात उज्‍वल करावे अशी आशा व्‍यक्‍त केली. या पुरस्‍कारासाठी मुरगूड शहराची निवड झालेबदल खासदार संजयदादा मंडलिक यांनी नगराध्‍यक्ष राजेखान जमादार, सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व मुरगूडचे सर्व नागरीक यांचे अभिनंदन केले.

मुरगूड शहरास पुरस्‍कार प्राप्‍त होण्‍यासाठी ब्रॅंड अॅम्‍बेसेडर विरेंद्र मंडलिक, नगराध्‍यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्‍यक्षा रंजना मंडलिक, पक्षप्रतोद संदिप कलकुटकी, नगरसेवक नामदेव मेंडके, जयसिंग भोसले यांच्‍या सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी मार्गदर्शन केले. हा पुरस्‍कार प्राप्‍त करण्‍यासाठी तत्‍कालीन मुख्‍याधिकारी संजय गायकवाड, मुख्‍याधिकारी हेमंत निकम, अभियंता प्रकाश पोतदार, प्र. स्‍वच्‍छता निरीक्षक अमर कांबळे, अमोल गव्‍हारे, शहर समन्‍वयक शुभम मोहिते, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, बबन बारदेस्‍कर, भिकाजी कांबळे यांच्‍यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *