बातमी

मे २०२२ अखेर कालव्याचे पाणी कागलच्या जयसिंगराव तलावात येणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये कालव्यासह श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावाची केली पाहणी

कागल, दि. १४: मे २०२२ पर्यंत कालव्याचे पाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये कालव्याच्या कामासह तलाव परिसराची पाहणी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य युवराज पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता सौ. बदामे व अधिकारी उपस्थित होते.
    
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याचे अपूर्ण काम एक नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. या कालव्याच्या एकूण ७६ किलोमीटर लांबीपैकी सुरुवातीच्या ३१ किलोमीटरचे काम पूर्ण आहे. ३२ ते ४८ किलोमीटरमधील बहुतांशी कामे पूर्ण आहेत. दिंडनेर्ली ता. करवीरपासून पुढील भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी आग्रही मागणी आहे. त्यामुळे, ४८ व्या किलोमीटर पासून ६६ व्या किलोमीटरपर्यंत असे १८ किलोमीटर कालव्याचे काम यामध्ये पूर्ण होणार आहे.

“मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी जनतेला दिलेल्या वचनापैकी आंबेओहळ प्रकल्प, सुळकूड पुल, बस्तवडे पूल ही अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. महान मराठा योध्दे सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे  काम पूर्णत्वाच्या दृष्टिक्षेपात आहे. तालुक्यातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे वचनही निवडणुकीत दिले होते. त्यापैकी लिंगनूर -मुदाळ तिट्टा चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत आहे. कागल – निढोरी व लिंगनूर -माद्याळ या रस्त्यांच्या चौपदरीकरणाला लवकरच मंजुरी मिळून कामे सुरू होतील.

कागल -श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसराची पाहणी करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,  ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे व इतर प्रमुख .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *