कागल(विक्रांत कोरे) :
कालच्या गहिनीनाथांचा उत्सव म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक. मोठ्या भक्ती भावाने गेली चार दिवस सुरू असलेला कागल चा उरूस संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने सर्व धार्मिक उत्सवावर बंदी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धार्मिक उत्सव रद्द करण्यात झाले आहेत. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले कागलचे ग्रामदैवत गहिनीनाथ हजरत गैबीपीर ऊरुस केवळ पारंपारिक धार्मिक विधी करण्यात आले.

शासनाने धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली असलेमुळे मोठ्या थाटात संपन्न होणारा उरूस फक्त धार्मिक विधीवंत कार्यक्रमानुसार पार पडला.

पहाटेपासूनच भाविकांनी दंडवत घातले नवसाचा गलेफ नाथांना घातले दर्शनासाठी भाविकांनी दर्ग्यात मोठी गर्दी केली होती. कोरणा मामारी च्या पार्श्वभूमीवर खेळण्याचे टोल्स पाळणे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते तथापि भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.