मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड येथील शिवाजी विद्यामंदिर च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी : जीवन भोसले यांची तर उपाध्यक्षपदी सौ. आश्वीनी सचिन गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष श्री सुनील घाटगे तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज आनिल बोटे होते.
यावेळी इतर सदस्य श्री विजय मेंडके, फौजी निशांत जाधव, रणजित डोंगळे, सौ जयश्री मोरबाळे, सौ सुनिता संजय उपलाने, सौ रेणू राजकिरण सातवेकर सौ. संगीता कांबळे तर शिक्षण तज्ञ जीवनराव कटके, तर सचिव पदी प्रविण आंगज. यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी राजू आमते, संदिप सांरग, के डी. मेंडके, मलगोंडा पाटील, विशाल रामशे ,सविता धबधबे आदी उपस्थित होते. स्वागत अनिल बोटे तर प्रास्ताविक प्रविण आंगज सर यांनी केले तर आभार मंकरंद कोळी सर यांनी मांडले