कागल (विशेष प्रतिनिधी) : लिंगनूर दुमाला ता, कागल येथील दुधगंगा नदी पात्रात असणाऱ्या जॅकवेल जवळ मागरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे लिंगनूर मधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नदीपात्रात मगर बघून गावातील नदीकाठच्या शेतकऱ्याना हादरा बसला आहे. एका सामान्य माणसाच्या निदर्शनास ही बाब येते मग ग्रामपंचायत काय करत आहे तसेच जीवित हानी झाल्यानंतर ग्रामपंचायत जागी होणार काय असा सवाल लिंगनूर मधील नागरिक करीत आहे. त्यामुळे वन विभागास ही घटना सांगून लवकरात लवकर याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी लिंगनूर गावातील नागरिकांतून होत आहे. एकंदरीत जिवित हानी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा लिंगनूर मधील ग्रामस्थ आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.