02/10/2022
0 0
Read Time:1 Minute, 37 Second

मुरगूड ( शशी दरेकर ) : बिद्री साखर कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष संजय ज्ञानदेव मोरबाळे ( मुरगूड ) यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर सचिवपदी फेरनिवड झाली आहे .

पुणे येथील महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर संजय मोरबाळे यांनी गेली पाच वर्ष सचिव पदावर काम केले आहे . तसेच जिल्हा साखर कामगार समन्वय समिती उपाध्यक्ष म्हणुनही काम केले आहे . सध्या ते बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे
अध्यक्ष तात्यासाहेब काळे (थेऊर ) व कार्याध्यक्ष रावसो पाटील (भोगावती ) यांनी पंचवार्षिक काळासाठी संजय मोरबाळे यांची सचिवपदी फेर निवड केली आहे . या निवडी कामी बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे .तसेच कामगार नेते आर वाय पाटील , भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर व सर्व कामगारांचे सहकारी लाभले आहे .

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!