मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील नगरपालिका हद्दीतील वाघापूर रस्त्यावरील दत्त मंदिर परिसर व स्मशान भूमीवरील विविध बांधकाम , सिमेंट काँक्रीट कंपाऊंड वॉलची कामे व सुशोभीकरणाची कामे बोगस ,दर्जाहीन चालू असल्याने नागरिकांनी बंद पाडली आहेत.
स्मशान भुमीतील दर्जाहीन वॉल काँक्रीट बेस संपूर्ण काढून नव्याने न केल्यास हे काम आम्ही होऊ देणार नाही . अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका
वर्षाराणी सचिन मेंडके यांनी दिला आहे. स्मशान भुमीतील निकृष्ट कामाचे पुरावे नगरपालिका अभियंता व मुख्याधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष यांच्याकडे दिले होते. त्यानंतर संबंधित ठेकेदारास काम व्यवस्थित व दर्जा युक्त करण्या बाबत नगरपालिकेने सूचना दिली होत्या. हे काम वर्षभर बंद होते.

मात्र आज त्या ठेकेदाराने अचानकपणे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला व वास्तविक पूर्वकल्पना न देता कोणत्या स्वरूपात काम करणार आहे हे न सांगता काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही ते काम नगरपालिकेला अभियंत्यांना सूचना देऊन बंद पाडले आहे.
या ठेकेदारावर नगरपालिकेत काम व्यवस्थित करत नसल्याच्या बऱ्याच तक्रारी आहेत. मिटींगमध्येही त्यासंदर्भात चर्चा सुद्धा झाली आहे. तरी या ठेकेदारावर एवढी मेहेरबानी का ? स्मशान भुमीमधील दर्जाहीन वॉल काँक्रीटचा
बेस संपूर्ण काढून नवीन न केल्यास हे काम होऊ देणार नसल्याचा इशाराही निवेदनातुन दिला आहे.