कागल : बस्तवडे, ता. कागल येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिंहभोसले हे होते. पाहुण्या म्हणून शिवानी भोसले उपस्थित होत्या. श्री.मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, बस्तवडे गावाच्या विकाससाठी नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या फंडातून निधी कमी पडू दिला जाणार नाही. नामदार मुश्रीफ साहेबांना गावोगावी विकासाच्या डोंगर उभा करायचा आहे. तसेच तालुक्यातील एकही रस्ता डांबरीकरण ना विना राहणार नाही. बस्तवडेच्या कामासाठी बस्तवडेचे माजी सरपंच किरण पाटील यांना पाठपुरावा करावा.
यावेळी प्रविणसिंह भोसले, पत्रकार मधुकर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी जगदंबा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी श्री प्रकाश पाटील व व्हाईस चेअरमन पदी शरद भोसले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, सरपंच सोनाबाई वांगळे, उपसरपंच जयवंत पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, किरण पाटील, प्रकाश शिंदे, शरद नरके, विष्णू वागळे, जी.एल. पाटील, ए. पी. पाटील, शिवाजी पाटील,
गंगाधर शिंत्रे, संजीव पाटील, रमेश शिंत्रे, शुभंम वागळे, अमर कांबळे, प्रकाश यादव, उदय भोसले, संताजी कारखान्याचे कर्मचारी आदी उपस्थित होते. स्वागत लखन कांबळे, प्रास्ताविक शुभम पाटील व आभार साताप्पा कांबळे यांनी मानले.