कागल(विक्रांत कोरे): आर एम डी, विमल नामांकित गुटखा व दोन कार असा सुमारे पाच लाख 21 हजार 484 चा गुटखा कागल पोलिसांनी पकडला. दोन आरोपींना अटक केली आहे. कागल न्यायालय कडे जाणाऱ्या बोगद्याजवळ सर्विस रोडवर सकाळी साडेअकरा वाजता ही कारवाई कागल पोलिसांनी केली.
आश्रम हाजी दाऊद मेनन वय वर्षे 42 राहणार फातिमा अपार्टमेंट, मच्छी मार्केट जवळ, रत्नागिरी व साहिल इस्माईल बागवान वय वर्षे 25 राहणार शिवाजीनगर, आझाद गल्ली, निपाणी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर पुजारी यांनी कागल पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.
करवीर उपयोगी पोलीस अधिकारी संकेत गोसावी, कागलचे पोलीस निरीक्षक अजित कुमार जाधव. यांनी कागल पोलीस ठाण्यात पत्रकार बैठक घेतली, ते म्हणाले महाराष्ट्रातून गुटखा विक्री करण्यास बंदी आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथील कागल पंचायत समितीच्या सर्विस रोड वरून एम एच 47 के ५२०१ व एम एच 08 आर 3208, या दोन कार वेगाने निपाणी कडून कोल्हापूर कडे जात होत्या. पोलीसानी त्या अडविल्या. त्यात विमल, आर एम डी गुटखा ,सुगंधी सुपारी असा एक लाख 41 हजार 484 रुपयांचा गुटखा होता .पोलिसांनी दोन कार व गुटखा जप्त केला आहे. दोन आरोपींना अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे पोलीस निरीक्षक अजित कुमार जाधव ,महिला पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, हावलदार विजय पाटील ,मोहन माटुंगे, प्रभाकर पुजारी, संदेश पवार ,आसमा जमादार यांनीही कारवाई केली.