बातमी

कागलमधील उपनगरांच्या रस्ते, गटर व इतर विकासकामांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ

आमदार श्री. हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून पाच कोटी ७५ लाख निधीची तरतूद

कागल, दि.६: कागलमधील उपनगरांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणासह गटरी, भूमिगत गटारी व विद्युतीकरण या विकासकामांचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून या कामांसाठी पाच कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कागल शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे व विकासामुळे शहरात वास्तव्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या उपनगरांमधील रस्ते, गटारी, भूमिगत गटारी व विद्युतीकरण या कामांची नागरिकांकडून मागणी होती. या निधी अंतर्गत खडीकरण, डांबरीकरणासह मजबुतीकरणाचे काम, भूमिगत गटारी व विद्युतीकरण होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, नगरसेवक प्रवीण काळबर, असलम मुजावर, सुनील माने, इरफान मुजावर, शहानुर पखाली
आदी प्रमुख उपस्थित होते.

“सर्वांगसुंदर कागल……….”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, सर्व सोयी -सुविधांनी युक्त असे कागल शहर बनले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह या शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्यासह स्वच्छ सुंदर ठेवण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. कागल शहर “सर्वांगसुंदर कागल” म्हणून नेहमीच आघाडीवर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *