बातमी

आशियाई पॉवरलिफ्टिंग जान्हवी सावर्डेकर हिचे मुरगूड मध्ये जंगी स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : इस्तंबुल ( तुर्की ) येथे नुकत्याच झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुरगूडच्या कु . जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने ६९ किलो गटात चार प्रकारात भारताला चार सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

त्यामुळे मुरगूड शहरात तिचे आगमन होताच ढोल ताशा ,हालगी कंरड्याच्या, फटाक्यांच्या आतीश बाजीत जान्हवी चे स्वागत करण्यात आले.

जान्हवी सावर्डेकर हिने ६९ किलो गटात
स्कॉड १९० , बेंचप्रेस १२०, डेडलिफ १८७ .५ टोटल ४९७ .५ वजन उचलले . या तीनही प्रकारात प्रत्येकी सुवर्णपदक व ओव्हर ऑल कामगिरीबद्दल सुवर्णपदक अशी चार सुवर्णपदके भारताला मिळवून दिली आहेत.

त्या मुरगूड क्रीडा रसिकांनच्या वतीने मुरगूड नाका नंबर एक पासून ते बाजार पेठ, शिवाजी रोड एस टी स्टँड मार्गे अंबाबाई मंदिर पासून परत सावर्डेकर काॅलनीत मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धातुन ज्युनियर, सिनीयर गटात सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत.

तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत सुवर्ण, रौप्यपदके पटकावली आहेत. राष्ट्रीय व राज्य व विद्यापीठ स्तरावर १३ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कांस्यपदके पटकावली. त्यानिमित्ताने मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, जगन्नाथ पुजारी, मा उपनगराध्यक्ष बंजरग सोनुले, अॅड सुधीर सावर्डेकर, दगडू शेणवी, राजु चव्हाण, मारुती ठाणेकर, मधुकर मसवेकर, एकनाथ देशमुख सर, मा.प्राचार्य महादेव कानकेकर, युवराज सुर्यवंशी व इतर मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.

विश्वनाथराव पाटील क्रिडा संकुल, लाल आखाडा, साई आखाडा, व शहरातील विविध मंडळाचे खेळाडू , उपस्थित होते. तिला बिभीषण पाटील, प्रशिक्षक विजय कांबळे यांचे मार्गदर्शन तर प्रा. प्रशांत पाटील शहाजी कॉलेज. कोल्हापुर, वडील जगदीश सावर्डेकर, भाऊ मयुर सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *