बातमी

महापुरामुळे नुकसान झालेली अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

भारतीय उद्योग महासंघ यांचेमार्फत उभारण्यात आली अंगणवाडी इमारत

कागल (विक्रांत कोरे) :
करनूर ता. कागल येथे महापुरामुळे नुकसान झालेली अंगणवाडी भारतीय उद्योग महासंघ यांचेमार्फत उभारण्यात आली. त्या अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा सी.आय.आय फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर मुथाली यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समिती चे सभापती जयदीप पवार होते.
यावेळी बोलताना सुधीर मुथाली म्हणाले, सी.आय.आय फौंडेशन 125 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून उद्योगांचे हित जोपासत समाजकार्याची नाळ जोडून घेऊन विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्यांच्या पाठीशी कायम त्यांना उभारी देण्यासाठी पुढे असते. कागल तालुक्यात करनूर व खेबवडे या दोन अंगणवाड्या महापुराच्या काळात पाण्याखाली गेल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या अंगणवाड्या फाऊंडेशनच्या माध्यमातून उभ्या केल्या. तसेच कोविड काळातही सी.आय.आय फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करून सुमारे पाच हजार कोरोना रुग्णांना बरे केले आहेत.
यावेळी सी.आय.आय अध्यक्ष दक्षिण झोन पल्लवी कोरगावकर म्हणाल्या, आपत्ती काळात भारतीय उद्योग महासंघ नेहमी अग्रेसर असतो. समाजात मध्ये कशाची गरज असते त्याकडे लक्ष देऊन सी.आय.आय फाउंडेशन नेहमी पुढे असते. यावेळी पंचायत समिती सभापती जयदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक के. डी. पाटील यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सी. आय.आय फाऊंडेशनचे दक्षिण झोन अध्यक्षा पल्लवी कोरगावकर, सी. आय.आय फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अरविंद गोयल, प्रताप पुराणिक जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग शिल्पा पाटील, पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प सौ. विद्या लांडगे पर्यवेक्षिका सौ. वंदना चव्हाण, सरपंच सौ. कविता जयसिंग घाटगे, आर्किटेक्चर अजय कोराने, कॉन्ट्रॅक्टर प्रदीप चौगुले, तातोबा चव्हाण, आण्‍णासो पाटिल, बाबुराव धनगर, रंगराव पाटील, सदाशिव पाटील ,कुमार पाटील, जयसिंग घाटगे, समीर शेख, वैभव आडके, राजमहंमद शेख, ग्रामसेवक देवेश गोंधळी, बाळासो पाटील, सदस्य सौ. उल्फत शेख, रेश्मा शेख , आदींसह ग्रा.पं सदस्य, गावातील नागरिक अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सी.आय.आय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दक्षिण झोन रवी डोली यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *