बातमी

कागल बस स्थानकातून दुचाकी चोरीस

कागल : कागल येथील बस स्थानकात लावलेली हिरोहोंडा पॅशन प्रो मोटरसायकल (क्र.एम एच 09 डी बी 2455) ही गाडी चोरीस गेली आहे सदर फिर्याद जितेंद्र आप्पासाहेब निंगनुर (रा. शाहूनगर बेघर वसाहत कागल) यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे.

अधिक माहितीनुसार जितेंद्र निंगनुर यांनी दिनांक 3 जुलै रोजी रात्री अकरा वाजता परगावी जाणार या कारणाने आपली मोटरसायकल कागल बसस्थानकातील कॅन्टीन समोर लावली होती त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांना आपली मोटरसायकल चोरीस गेल्याचे समजले यासंबंधी त्यांनी मोटरसायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी कागल पोलीस ठाण्यात गाडी चोरीची तक्रार दाखल केली अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल गुरव करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *