बातमी

मुरगूड विद्यालय ज्यू. कॉलेजच्या १९८४-८५ मधील विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या सन १९८४- ८५ मधील दहावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल ) येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं मा. श्री. एस. जी. सावंत हे होते.

प्रथम दिपप्रज्वलन, प्रतिमापूजनानंतर शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मयत वर्गमित्र, मयत शिक्षक, शिक्षिका यांना दोन मिनिटे स्थब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

स्वागत व प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष मा . श्री . राजेखान जमादार यानीं शालेय जीवनातील अनेक आठवणींचा उहापोह करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला . त्यानंतर गुरुजनांचे पाद्य पूजनाचा कार्यक्रम पार पडला . सर्व उपस्थित शिक्षकांचे शाल , श्रीफळ , पानसुपारी , फेटा , सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

३८ वर्षानंतर भेटलेले माजी विद्यार्थि- विद्यार्थिनीच्या स्नेहमेळाव्यात जून्या वर्गमित्र – मैत्रिणींनी आपल्या शाळेतील जून्या स्मृतीनां उजाळा देत गळाभेटीने आनंद व्यक्त केला.

आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या संस्कारित करणाऱ्या शाळा व शिक्षकांबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. शालेय जीवनातील केलेल्या गमती -जमती, खोडया ,शाळेला मारलेली दांडी , त्याबद्दल मिळालेली शिक्षा , मित्रांची उडवलेली टर , तर शिक्षकांची केलेली फजिती या अशा असंख्य रम्य आठवणीना यावेळी उजाळा मिळाला.

यावेळी मा. श्री. चंद्रकांत माळवदे सर, सौ .पाटील मॅडम, श्री. एस. आर पाटील मुख्याध्यापक ( मु. वि. मुरगूड ), माजी विद्यार्थी श्री. प्रशांत शहा, श्री. अशोक पाटील, श्री. दत्तात्रय क्षिरसागर, श्री. बाबू रणवरे, संजीव तोरसे, मंजुषा गाडगीळ मुरगूड, सुनिता पाटील यमगे यानीं मनोगत व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात मा . श्री .एस्. जी . सावंत म्हणाले शेतीसह विविध क्षेत्रात छोट्या – मोठया पदावर काम करणाऱ्या या माजी विद्यार्थि- विद्यार्थिनीनी ३८ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर उत्साही सहभाग हे या स्नेह मेळाव्याचे वैशिष्टय म्हणावे लागेल . या स्नेहमेळाव्याने मी भारावून गेलो . इथून पुढेही एकमेकांच्या गाठीभेटीसाठी असा स्नेहमेळावा घेण्यात यावा अशी भावना त्यानी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमात स्नेहभोजन, व रणजीत कदम यांचा करा ओके या बहारदार गितांनी कार्यक्रमाची सांगता झाली. या स्नेहमेळाव्यास सर्वश्री वी. रा. घाटगे सर, आर. एच. पोळसर , पी.डी. पाटील सर, चंद्रकांत माळवदे सर इंदलकर सर, कोरे सर, एकनाथ देशमुख सर, व इतर शिक्षक, शिक्षिका व माजी विद्यार्थी राजू चव्हाण, प्रशांत शहा, राहुल घाटगे, उदय राजिगरे, संजय किल्लेदार, समाधान दरेकर, महादेव खाटांगळे यांच्यासह विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते . शेवटी आभार अशोक पाटील सर यानी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *