25 हजार शिवसैनिक सभासद नोंदणी फॉर्म युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडे सुपूर्द
साके(सागर लोहार) : कोल्हापूर जिल्हातील दोन खासदार शिवसेनेतून बंडखोर शिंदे गटात गेले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाशी आम्ही एकनिष्ठ असून माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत खंबीरपणे राहणार आहे. पहिल्या टप्यात 25 हजार शिवसैनिकांची नोंदणी केली असून येत्या कांही दिवसात कागल तालुक्यातून 1 लाख शिवसैनिक सभादसांची नोदणी करणार असल्याचा ठाम विश्वास गोकुळ चे संचालक मा.अंबरिषसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे माजी पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री,आदित्य ठाकरे यांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख उपस्थीत खासदार विनायक राऊत,जिल्हा संपर्क प्रमुख अरूबाई दुधवडकर,जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी महापौर श्रद्धा जाधव,सिद्धीविनायक ट्रष्ट मुंबई चे अध्यक्ष,आदेश बांदेकर होते.
यावेळी कागल तालुक्यातील 25 हजार शिवसैनिकांच्या सभासद नोंदणीचे फाॅर्म अंबरिषसिंह घाटगे यांचे हस्ते सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे जमा करण्यात आले.
कार्यक्रमास नितीन बानुगडे -पाटील, युवासेवा उपजिल्हाप्रमुख प्रतिक क्षिरसागर, धनराज घाटगे, अभिजीत पाटील, रणजित मुडूकशिवाले,अशोक पाटील, उत्तम वाडकर, शरद पाटील, किरण पाटील, दत्तात्रय दंडवते,युवराज पाटील सचिन तळेकर, सुनिल आदी शिवसैनिक उपस्थीत होते.