मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा चांगभलंच्या गजरात मौठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पडली. पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पूजा अभिषेक पार पडल्यानंतर महाआरती करण्यात आली .यावेळी देवस्थान समितीच्या वतीने पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे यांच्या हस्ते आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला . या महाआरती दरम्यान प्रथम भाविक म्हणून येण्याचा मान कूर ता .भुदरगड येथील भक्तास मिळाला मंदिर समितीच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला .कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली दोन वर्षे ही यात्रा रद्द करण्यात आली होती . आज पहाटेपासून भाविकांचा अक्षरशः महापूर पहावयास मिळाला.
सकाळी दहा वाजता कुंभार वाड्यातून मानाची नागमूर्ति मंदिरात स्थानापन्न करण्यात आली . यावेळी महिलांनी दूध लाह्या वाहण्यासाठी गर्दी केली होती . भाविकांची गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला होता . यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह गारगोटी पोलीस स्टेशनच्या वतीने चोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . भाविकांसाठी गारगोटी एसटी आगारातून ज्यादा बसेसची सोय उपलब्ध असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत होते.
यावेळी भाविकांनी रोख रकमेसह दूध लाह्या तेल व नारळ देण्यासाठी गर्दी केली होती .यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे, सचिव रावसाहेब बरकाळे, एकनाथ जठार, शिवाजीराव गुरव, विष्णुपंत गुरव, रवी गुरव, जोतीराम गुरव, सागर गुरव, मधुकर गुरव, पुरोहित विजय स्मार्त,जोतीराम आरडे, दिगंबर कुरडे, जयसिंग पाटील यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते .