कागल (प्रतिनिधी): राज्यस्तरीय कुंग- फू स्पर्धेत संकल्प सुनील संकपाळ या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले. मुंबई- पनवेल येथे नुकततीच ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स कुंग फू असोशियन यांच्यावतीने पनवेल मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत 280 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून 73 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
करवीर तालुक्यातील कंदलगाव येथील संकल्प सुनील संकपाळ या नववर्षाच्या स्पर्धकांने” फाईट” मध्ये “सुवर्णपदक” व तोलु “मध्ये “सिल्वरपदक” संपादन केले. संकल्प संकपाळ इयत्ता तिसरीत शिकतो आहे.
त्याने 24 किलो वजन गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे . संकल्प या खेळाडूस विजय वायदंडे सर, सिनियर प्रशिक्षक -सिफू उमेश चौगुले सर, उमाशंकर जाधव सर ,जय किशनसिंग सर ,वडील सुनील संकपाळ ,आई निलम संकपाळ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. नऊ वर्षीय संकल्प या खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.