बातमी

सिटी प्राईड हॉस्पिलकडून कागल येथे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

कागल : कागलमधील सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचा असाच प्रत्यय आला. येत्या २६ जानेवारीला सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कागलमधील आपुलकीच्या रुग्णसेवेला २ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांच्या अगदी कमी वेळेत कागल आणि परिसरातील सर्व लोकांच्या पसंतीस हॉस्पिटल उतरले आहे. हॉस्पिटलच्या सर्व सुविधा आणि एकाच ठिकाणी होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया यामुळे लोकांना आता इतरत्र धावाधाव करावी लागत नाही त्यातच आणखी एक महत्वाची सुविधा म्हणजे कॅशलेस सुविधा ज्यामुळे ऐनवेळी येणारा खर्चाचा भार कमी होतो. एकूणच या दोन वर्षात अनेक यशस्वी शस्त्रक्रिया हॉस्पिटलने समर्थपणे पार पाडल्या आहेत.

द्वितीय वर्धापन दिन साजरा करत असताना हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. तुषार भोसले यांनी काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे कागल शहर मर्यादित आंतर शालेय चित्रकला स्पर्धा. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने हॉस्पिटल नेहमीच आग्रही असते. लहान मुलांमध्ये नवचैतन्य पसरावे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी ‘किड्स प्राईड’ ही चित्रकला स्पर्धा कागल येथे आयोजित केली होती. तब्ब्ल ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी यासाठी भाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला,

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत नरवाडे उपस्थित होते.हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. तुषार भोसले,डॉ.तृप्ती भोसले (पेडियाट्रीक न्यूरोलॉजिस्ट) व डॉ. कविता भोसले (सी ई ओ- सिटी प्राईड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल), स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ डॉ. स्मीनल चव्हाण, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तेजस किल्लेकर, भूलतज्ञ डॉ प्रवीण चव्हाण, कागल नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री नितीन कांबळे, डायग्नोस्टिक सेंटरचा सर्व स्टाफ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.
इयत्ता १ली व २री -गट क्रमांक १
प्रथम क्र – परिकुमारी सुनीलकुमार महातेपटेल (ना. गोपाळ कृष्ण गोखले वि.मं. कागल)
द्वितीय क्र. – आलिया समीर नदाफ (ना. गोपाळ कृष्ण गोखले वि.मं. कागल)
तृतीय क्र. – सिद्धार्थ सागर शिंदे (श्री. स्वामी समर्थ वि.मं.कागल)
उत्तेजनार्थ १ – स्वयंम संजय दिवटे (श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)
उत्तेजनार्थ २ – कार्तिक गुडपिंकर (स्व.गाताडे मतिमंद विद्यालय,कागल)

इयत्ता ३री व ४थी – गट क्रमांक २
प्रथम क्र -अवनी अमित चौगुले (श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)
द्वितीय क्र. – फाल्गुनी रितेश धुरी (श्री. दत्त विद्यामंदिर,कागल)
तृतीय क्र. – महिमा कुमार ऐवाळे (संत रोहिदास विद्यामंदिर,कागल)
उत्तेजनार्थ १ – आरोही तुषार भोसले (श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)
उत्तेजनार्थ २ – प्रणित प्रशांत रेडेकर (श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)

इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वी – गट क्रमांक ३
प्रथम क्र – कर्तव्य रमेश कुराडे (श्री. शाहू हायस्कुल,कागल)
द्वितीय क्र. -शिवानी शरद बोते (दूधगंगा विद्यालय,कागल)
तृतीय क्र. – मुग्धा संदीप घाटगे (सरलादेवी माने हायस्कुल,कागल)
उत्तेजनार्थ १ – पूर्वा सागर देवर्षी (होलिडियन इंग्लिश मिडीयम स्कुल, कागल)
उत्तेजनार्थ २ – प्रेम बाळासो कांबळे (हिंदुराव घाटगे विद्यामंदिर, कागल)

इयत्ता ८वी,९वी व १०वी – गट क्रमांक ४
प्रथम क्र – स्नेहल विजय झंजे (दूधगंगा विद्यालय,कागल)
द्वितीय क्र. -समी नौशादअली मुल्ला (होलिडियन इंग्लिश मिडीयम स्कुल, कागल)
तृतीय क्र.- आदिती सिद्धाजी कांबळे (दूधगंगा विद्यालय,कागल)
उत्तेजनार्थ १ – प्रतीक मनोज जमदग्नी (दूधगंगा विद्यालय,कागल)
उत्तेजनार्थ २ – शिवतेज धोंडीराम पाटील (श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)
उत्तेजनार्थ ३ – सृजन राजकुमार माने (दूधगंगा विद्यालय,कागल)
उत्तेजनार्थ ४ – स्नेहा सुरेश वारके (श्री. शाहू हायस्कुल,कागल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *