बातमी

सर्वांग सुंदर गडहिंग्लज शहर हाच आमचा ध्यास – आमदार हसन मुश्रीफ

एक कोटी निधीच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ

गडहिंग्लज, दि. २१: सर्वांगसुंदर गडहिंग्लज शहर हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. शहरातील एक कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. विकासात हे शहर सदैव अव्वल असेल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रारंभ झालेल्या रस्त्यांच्या कामांची नावे व निधीचा आकडा असा,
१) गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील संकेश्वर रोड ते डॉ. पाटोळे हॉस्पीटल पर्यंतचा रस्ता खडीकरण – २४ लाख.
२) गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील माणिकबाग रस्ते डांबरीकरण. (दिनकर चव्हाण घर ते शंकर साळुंखे घर, माळगी घर ते रिंगणे घरापर्यंत, गुरू निवास घर ते शंकर पार्वती निवास, गुरव अपार्टमेंट ते कातकर अपार्टमेंट) – ३५ लाख.
३) गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील नदीवेस येथील शिवगोंडा पाटील घर ते रावळ घर गटर बाधंकाम- १२ लाख.
४) गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील कडगांव रोड नदाफ कॉलनीतील संदीप फगरे घर ते आरबाज नाईकवाडे घर रस्ता मजबुतीकरण- सात लाख.
५) गडहिंग्लज नगरपरिषद हददीतील बी. जी. पाटील कॉलनी मटण मार्केट रोडचे शेळके घर ते चतुर घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे- १८ लाख.
६) गडहिंग्लज नगरपरिषद हददीतील भिमनगर येथील गणपती कांबळे घर ते मुनीर नदाफ घर गटर बाधंकाम १२ लाख.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे, किरण कदम, उदय जोशी, वसतराव यमगेकर, हारुण सय्यद, नागेश चौगुले, आण्णासाहेब देवगोंडा, सुरेश कोळकी, प्रतिक क्षीरसागर, डाॅ. किरण खोराटे, अशोक मेंडूले, उदय देसाई, सौ.शर्मिली पोतदार, सौ. रेश्मा कांबळे, शारदा आजरी, सुनिल चौगुले, संतोष कांबळे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, अमर मांगले, ऊदय परीट या प्रमुखांसह मोठ्या संख्येने प्रभागातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *