कागल पोलिसांची मोठी कारवाई: ११.३८ लाखांच्या अवैध दारू पिसारासह कंटेनर जप्त!

कागल: कागल पोलिसांना अवैध दारू वाहतुकीविरोधात राबवलेल्या मोहिमेत मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईत कंटेनरसह एकूण ११ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. विभागातंर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल … Read more

ज्येष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.        अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अशोक डवरी यांनी व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस किशोर पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पी डी … Read more

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जीवन संघर्षमय व वेदनेने भरलेले होते – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड (शशी दरेकर) : अण्णाभाऊ साठे त्यांचे जीवन संघर्षमय आणि वेदनेने भरलेले होते ते क्रांतिकारी साहित्यिक होते असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ या कार्यक्रमात बोलत होते. ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण लेखन हे शोषितांच्या आणि … Read more

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे; १२ हजार ग्रामपंचायतींसह मोठी रणधुमाळी

मुंबई: राज्यात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा नववर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सुमारे १२ हजार ग्रामपंचायती, २० जिल्हा परिषदा, २१ पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक … Read more

८ वा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढीबाबत केंद्र सरकारचे संसदेत मोठे स्पष्टीकरण; वाचा सविस्तर

नवी दिल्ली: ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) फिटमेंट फॅक्टर आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पहिल्यांदाच संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फिटमेंट फॅक्टरसह वेतन आयोगाच्या सर्व शिफारशींवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार केवळ ८ व्या वेतन आयोगालाच आहे, असे सरकारने स्पष्ट केले … Read more

कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी कारवाई: गगनबावडा येथील कृषी विस्तार अधिकारी ज्ञानदेव जाधव निलंबित

कोल्हापूर: गगनबावडा तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यामुळे आणि पदीय कर्तव्यात गंभीर कसूर केल्यामुळे जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जैसमिन (भा.प्र.से.) यांनी कृषी विस्तार अधिकारी श्री. ज्ञानदेव केदारी जाधव यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.  महसूल शाखेत आग, नियंत्रण कक्षातून अधिकारी गायब मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ … Read more

कच्चे विषय पक्के करणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात : अनिल अस्वले

मुरगूडच्या लिटल मास्टर गुरूकुल गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम पार मुरगूड (शशी दरेकर) : विषयात कच्चे असणारे विद्यार्थी आयुष्याच्या वाटचालीत गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे पक्क्या मार्गावर मार्गक्रमण करून जीवनात यशस्वी होतात असे मत एन एस एस सी चे विभाग प्रमुख अनिल अस्वले यांनी व्यक्त केले.        येथील लिटल मास्टर गुरुकुलम शाळेतील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.  मुख्याध्यापिका सौ. सुमन अनावकर … Read more

मुरगूडच्या लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल हिरक महोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०२ ऑगष्ट २०२६रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे.       २ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद … Read more

माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा … Read more

निधन वार्ता – चाँदखान जमादार

मुरगूड (ता कागल ) येथील चाँदखान बा जमादार (वय ७८) यांचे दुःखद निधन झाले. पै. बाळासाहेब दादासाहेब जमादार विकास सेवा संस्था मुरगूड चे ते संचालक होते. तसेच मुरगूड विद्यालयातील लिपिक मजहर जमादार यांचे ते वडील होते. जियारत विधी उद्या गुरुवारी मुरगूड मध्ये आहे.

error: Content is protected !!