कागल (प्रतिनिधी) : श्री गहिनीनाथ उद्योग समुहाचे सदस्य व साप्ताहिक गहिनीनाथ समाचार या साप्ताहिकाचे रणदेवीवाडी प्रतिनिधी शिवाजी बापूसो फडतारे (वय ६१) यांचे निधन झाले.
Advertisements
गेली वीस वर्षांपासून ते गहिनीनाथ समाचारचे रणदेवीवाडी पत्रकार म्हणून कार्यरत होते. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी रणदेवावाडी, हुपरी, यळगुड, सांगाव या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत आणि त्यामुळे भागातील विकासात भर पडली आहे.
Advertisements

वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात त्यांनी सहभाग नोंदवला असून गावात प्रामाणिक पत्रकार म्हणून ते नावारुपास आले आहेत.
त्यांच्यामागे १ मुलगा, २ विवाहीत मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.