मुरगूड ( शशी दरेकर ):
मुरगूड येथून पंढरपूर १९९२ ला पायी दिंडीची सुरुवात
“पाऊले चालती पंढरीची वाट,सुखी संसाराची सोडुनिया गाठ” या
संतवाचनालयातील भावार्थ जपत मुरगूड येथील संत कबीर दिंडी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिक वारी दिंडी सोहळा मुरगूड ते पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान केले आहे
संत कबीर दिंडी म्हणून कागल तालुक्यातील मुरगूड येथे प्रसिद्ध आहे
ही दिंडी दिवाळीतच भाऊबीज दिवशी कार्तिक आषाढीला मुरगूड ते पंढरपूर पायी दिंडी जात आसते या दिंडीची सुरुवात वाघापूर येथील अभियंता म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ प. राम तोरशे साहेब यांनी सुरुवात केली ३४ वर्षापूर्वी चालू केलेली तीच दिंडी आज तागायत अतिशय मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरू आहे.
ही दिंडी कैलासवासी श्री दिलीपसिंह विश्वनाथराव पाटील, कै.अजितसिंह वि. पाटील यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरू केली होती.
टाळ मृदुगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात ही दिंडी पंढरपूर कडे दहा दिवस पायी दिंडी चालू असते. यावेळी रस्त्यावर सर्व भाविक दिंडीचे स्वागत करत असतात.
दिंडी साठी कॅबिनेट मंत्री हसनसो मुश्रीफ रणजितसिंह पाटील व प्रविणसिंह पाटील यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींच्या मदतीने पायी दिंडी पुर्ण होते व मुरगूड शहरात दिंडी परत आले नंतर मोठ्या प्रमाणात म्हामंदे केले जाते व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
दिंडी सोबत डॉक्टर,आचारी, व भक्तांनची सेवा करण्यासाठी स्वयम् सेवक ही असतात ही दिंडी यशस्वीरित्या पार करण्यासाठी व सुरवाती पासून जे सहकार्य करतात ते विणेकरी मारुती शेट्टी, पांडुरंग भांदीगरे, लखन वरपे, बाळू शेळके, अशोक भोसले, राजू चव्हाण (माऊली लाडु),बापसाप रावळ,श्रीकांत गायकवाड,राजू गोधडे, स्वप्निल साळुंखे,विठ्ठल भुते, गुड्डू भुते, बाळासाहेब हासबे, आदींसह भुते बंधु तसेच मुरगुड मधील सर्व तरुण मंडळे यांचे सहकार्य लाभते.