कागल : येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पांडुरंग नलवडे यांची कोल्हापूर जिल्हा भोई समाजाच्या मानद सचिव (ऑन. सेक्रेटरी) पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समाजाच्या संघटनात्मक कार्याला गती व बळकटी देण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या निवड प्रक्रियेवेळी भोई समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने व सहमतीने नलवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सामाजिक कार्यातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कागलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नूतन मानद सचिवांचे समाज बांधव, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून जोरदार अभिनंदन होत आहे.