मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक – यशवंतराव थोरात

शाहू वाचनालय, प्रा. शामराव पाटील, संभाजी यादव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित मुरगुड (शशी दरेकर) : बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर घेण्यापेक्षा मैत्री केली असती तर इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले असते. 1947 च्या फाळणीच्या वेदना आपल्याला भोगाव्या लागल्या नसत्या. भारतात धर्म आणि संस्कृतीचे विविध प्रवाह एक होऊन हिंदी महासागराला मिळाले असते. आजच्या राजकर्त्यांनी … Read more

व्यापारी पतसंस्थेचे संचालक धोंडीराम मकानदार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक व एम्.जे. अँग्रोचे चेअरमन आणि लकी सेवा केंदाचे मालक तसेच गणेश तरूण मंडळाचे जेष्ठ सदस्य मा. हाजी धोंडिराम मकानदार यांचा ६३ वा वाढदिवस श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी … Read more

मुरगूड -मुदाळ तिट्टा मार्गावरील म्हारकी पुलाच्या रुंदीकरणासाठी सोमवारी रास्ता रोकोचा इशारा !

मुरगूड ( शशी दरेकर ) : निपाणी मुदाळ तिट्टा मार्गावरील निढोरीजवळ असलेल्या म्हारकी नावाच्या म्होरी पुलामूळे पाण्याला तुंब येवून शेती पीकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामूळे पूलाच्या रुंदीकरणासाठी सोमवार दि २२ मे२०२३पासून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निपाणी -मुदाळ तिट्टा या राज्य मार्गावर मुरगूड – निढोरी दरम्यान म्हारकीचा छोटा पूल आहे. … Read more

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ … Read more

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची यादी २२ मे पर्यंत प्रसिध्द होणार -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे

कोल्हापूर, दि.17 : राज्यात क्रीडा विभागाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार्थीची यादी प्रसिध्द करण्यात आली असून यादीबाबत आक्षेप असल्यास क्रीडा संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in  या ईमेल वर २२ मे २०२३ पर्यंत हरकत / आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या … Read more

मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ … Read more

जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे टप्पा 2.0 अभियानांतर्गत पूर्ण होणार

कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान 2.0 सदस्य सचिव यांनी दिली आहे. … Read more

मिरवणुकीतील धक्काबुक्कीच्या रागातून डोक्यात मारली खुर्ची

कागल : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुक दरम्यान झालेली धक्काबुक्कीचा राग मनात धरुन अनिकेत पाटील (सोमवार पेठ, कागल), अनिकेत गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल), महेश गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल) यांनी स्वप्निल लक्ष्मण मोहीते (किर्लोस्करवाडी), अक्षय आप्पासो मर्दाने यांना मारहाण केली असून याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून स्वप्निल लक्ष्मण मोहीते व त्यांचे मित्र … Read more

मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना

मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य अशा २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ़ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विरेंद्र मंडलिक, उद्योगपती बाबा जांभळे, साहिल ढमाले, देवदत्त गंगावनवाले, अॅड सुधीर सावर्डेकर प्रमुख उपस्थित होते … Read more

जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १४ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात … Read more

error: Content is protected !!