खेळ बातमी

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.

जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ किलो वजन गटात स्क्वॉड – १९० किलो, बेंच – १२० किलो, व डेडलिप्ट – १७७.५ किलो असे ४८७.५ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले आहे.तिला मार्गदर्शक प्रा.प्रशांत पाटील, प्रशिक्षक विजय कांबळे व प्राचार्य,स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे मार्गदर्शन तर वडील जगदीशकुमार सावर्डेकर,भाऊ मयुर सावर्डेकर यांचे प्रोसाहन लाभले.

One Reply to “मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *