खेळ बातमी

मोटे स्पोर्ट्स अँकॅडमी, वसगडे च्या बॉक्सरांना राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तीन पदकांची कमाई

कोल्हापूर दि. 28 : नागपूर येथे दिनांक 22 ते 26 जुलै रोजी झालेल्या सब ज्युनियर मुले व मुली च्या राज्य स्तरीय
बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कु पूर्वा मलकर हिने 49-52 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक तसेच वेदांत पवळे याने 49-52 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक तर 32 ते 35 किलो वजन गटामध्ये करण माळी याने कांस्य पदकाची कमाई केली.

हे सर्वजण मोटे स्पोर्ट्स अँकॅडमी, वसगडे मध्ये प्रशिक्षक प्रा.प्रशांत मोटे, गौरव जाधव यांच्याकडे सराव करत आहेत. त्यांना बापूसाहेब पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक शांतीसागर पाटील तसेच पोलिस पाटील.संजय पाटील, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष शशीकिरण हेरवाडे, सरपंच योगिता बागडी , उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य, मार्गदर्शक सुनील पाटील, माऊली फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य तसेच चंद्रकांत मलकर, राजगोंडा माळी, विशाल पवळे या सर्वांचे मोलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *