बातमी

मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ मे रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास निढोरी-कागल रोडवर शाहू कारखाना फाट्या जवळ आरोपी सुनील अशोक पाटील याने आपल्या मिनी बस भरधाव वेगाने चालवून समोरून येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवरील पांडुरंग तोरस्कर यांना गंभीर दुखापत झाली, जखमी पांडुरंग तोरस्कर यांना इस्पितळात दाखल करताना त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघात प्रकरणी मिनी बस चालक सुनील पाटील याच्यावर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रसाळ पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *