मुरगूड शहर पत्रकार संघामध्ये दैनिक महासत्ता चे संस्थापक संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांना  श्रद्धांजली

मुरगूड (शशी दरेकर) : दैनिक  महासता चे संस्थापक संपादक स्व. वसंतराव दत्तवाडे साहेब यांना मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वांनी स्तब्धता पाळून त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.           यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांच्या निगर्वी आणि वृतपत्र क्षेत्रात केलेल्या … Read more

कणेरी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील कणेरी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही आग अचानक लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, दवाखान्यातील औषधे, अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आणि इतर सर्व साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न दवाखान्यातून आगीच्या ज्वाळा … Read more

कागलजवळ महामार्गावर कर्नाटकातील भाविकांना बेदम मारहाण; ओव्हरटेकच्या वादातून इनोवा कारची तोडफोड

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ कारणावरून कोल्हापूर आणि कागलमधील काही तरुणांनी कर्नाटकातील भाविकांना महामार्गावर अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत भाविकांच्या इनोवा कारची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून, या प्रकारामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सायंकाळी कागल येथील लक्ष्मी टेकडीजवळ घडलेल्या … Read more

मुरगूडातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिने, संतप्त नगरसेवकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गडहिंग्लज – कागल रस्त्याच्या पूर्ततेसाठी पुन्हा तिसरी बैठक, कामाच्या पुर्ततेसाठी २ ऑगस्ट नवी डेडलाईन मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिन्याहून अधिक काळ उलटल्यामुळे नगरसेवक संतापले. बैठकीत नगरसेवकांनी रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांना चांगलेच  धारेवर धरले. शहरातील रस्ता २ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रस्ता प्रकल्प विभागाचे ॲथॉरिटी इंजिनियर … Read more

कागल तहसीलदार कार्यालयात वाद; माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, राज कांबळेंचा पत्रकार परिषदेत दावा

कागल (प्रतिनिधी) : सामाजिक कामासाठी मी तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यातून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तो पूर्णपणे चुकीचा आहे. न्याय दंडाधिकारी सारख्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन माझ्यावर गुन्हा दाखल करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांच्या दालनातील सीसी टीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर सत्य समोर येईल. उलट या कार्यालयात कोणतेही काम … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी घातक का आहे?

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सहज उपलब्ध होणारी प्लास्टिकची पाण्याची बाटली सर्रास वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, ही सोयीची वाटणारी बाटली आपल्या आरोग्यासाठी ‘सायलेंट किलर‘ ठरू शकते? अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे की, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. प्लास्टिक बाटल्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम: १. मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्स: प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिताना … Read more

राज्याच्या आरोग्य विभागातील  १५ हजार कंत्राटी कर्मचारी होणार शासकीय सेवेत समाविष्ट : माजी खासदार प्रा. संजय मंडलिक

राज्य संघटनेकडून माजी खासदार मंडलिक यांचा सत्कार वेतनासाठी ११५३  कोटी रुपये खर्चास शासनाची मान्यता कोल्हापूर जिल्ह्यातील ६५०  कर्मचा-यांना लाभ मुरगूड (शशी दरेकर) : आरोग्य विभागाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असणाऱ्या १५ हजार १० कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत समविष्ठ करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी  सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास … Read more

कागलमध्ये घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कागल: कागल शहरातील लोहार गल्ली येथे राहत्या घराची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्मिला उदय कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अचानक घराची भिंत कोसळल्याने उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडली, ज्यात त्या गंभीर जखमी … Read more

बेनिक्रे ग्रामपंचायतीमधील वाद कायम; खुलाशाऐवजी पुन्हा ग्रामसभेचे आश्वासन, ग्रामस्थांचा संताप

कागल: बेनिक्रे ग्रामपंचायतीमध्ये ‘माझी पंचायत’ पोर्टलवर चुकीचे फोटो अपलोड केल्याचा वाद अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व तरुणांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विकास कामांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला होता. प्रशासक, सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चार दिवसांत खुलासा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती, परंतु प्रशासनाने केवळ … Read more

पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. मुरगूड नगरपरिषद कडुन शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे तथापी अति पावसामुळे गढूळ पाणी पुरवठा झालेस , कॉलरा, टायफॉइड, कावीळ यांसारख्या  जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी १५ ते २० मिनिटे पाणी … Read more

error: Content is protected !!