मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथिल बाजारपेठेतील श्री .जैन श्वेतांबर मंदीरमध्ये श्री.वासुपूज्य भगवान काच मंदीर म्हणजे मुरगूड परिसरामध्ये सुंदर , कलात्मक , नाविन्यपूर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते.
पर्युषण पर्व हा जैन धर्मातील पवित्र आणि आध्यात्मिक असा सण मानला जातो.

हा सोहळा थाटामाटाचा किंवा मनोरंजनाचा सण नसुन तो आत्मशुध्दी , आत्मपरीक्षण , संयम , तप आणि क्षमाभावाचा काळ आहे.
या पर्युषण पर्व उत्सवानिमित्य आठ दिवसामध्ये मंदीरात दररोज विविध पूजा, स्नात्र पूजा, वाचन, विविध नयनरम्य आंगी याबरोबरच सायंकाळी आरती, भावना ( भक्ती गीते ), दांडिया रास, गर्भानृत्ये असे विविध कार्यक्रम भक्ती रसात संपन्न झाले.
या पर्व निमित्य जैन श्रावक श्राविकांच्या विविध सिद्धीतप, अठई, आठ्ठम, समोसरण तप, नवकार महामंत्र अशा विविध तपश्चर्चा या पर्युषण उत्सवात संपन्न झाल्या.
पर्युषण पर्व मधील ” संवत्सरी ” दिवशी जीव प्राण्यांची क्षमा याचना मागून संपन्न झाली . या पर्व निमित्य ‘ वर घोडा ‘ (रथाची मिरवणूक ) उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या काळात मंदीराभोवती सुंदर विद्यूत रोषणाई करण्यात आली होती.
या उत्सवामध्ये मुरगूड येथिल बांधवाबरोबर सोनगे , बाणगे , बिद्री ,राशिवडे येथील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.