कागल: श्री गहिनीनाथ सहकार समूहातील श्री दिलीपरावजी सणगर पतसंस्था, श्री गहिनीनाथ दूध संस्था, श्री गहिनीनाथ विकास संस्था व समूहातील इतर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साही व मेळाव्याच्या वातावरणात पार पडल्या.
सभेच्या सुरुवातीला सर्व सभासदांचे स्वागत महेश मगदूम यांनी केले. याप्रसंगी समूहाचे अध्यक्ष श्री सम्राट सणगर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व संस्थांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. पतसंस्थांच्या बाबतीत शासनाने लादलेली ‘अंशदान’ ची जाचक अट रद्द करावी अशी मागणी करत त्यांनी त्याचा तीव्र निषेध केला. तसेच विकास सोसायटीच्या विविध कर्ज योजनांबाबत सभासदांना माहिती दिली. गहिनीनाथ दूध संस्थेचा आढावा चेअरमन श्री अमर सणगर यांनी मांडला.


लाभांश व बोनस जाहीर:
- श्री दिलीपरावजी सणगर पतसंस्था: संस्थेला अहवाल सालात सुमारे ₹१,००,०००/- इतका नफा झाला असून सभासदांसाठी ९ % लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला.
- श्री गहिनीनाथ विकास संस्था: संस्थेला ₹२,२६,०००/- नफा झाला असून ६% लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला.
- श्री गहिनीनाथ दूध संस्था: दिवाळी सणासाठी उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रति लिटर ₹६.५० पैसे आणि गाय दुधासाठी प्रति लिटर ₹२.५० पैसे इतका दूध बोनस देणार असल्याचे त्यांनी घोषित केले.
डिजिटल ठेव पावती व सामाजिक बांधिलकी:
सभेत श्री दिलीपरावजी सणगर पतसंस्थेच्या मार्फत डिजिटल ठेव पावतीचे वाटप व शुभारंभ करण्यात आला. पहिली पावती वितरण संचालिका रंजना सणगर, कांचन सणगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तसेच सामाजिक बांधिलकी जपत समूहाच्या धर्मादाय निधीतून ‘आकाश मित्र मंडळ, कागल’ यांना निधीचे वाटप समूह संचालक महेश बोते, अमित हेगडे, राजेंद्र पसारे यांच्या हस्ते करण्यात आले.

वार्षिक अहवालाचे वाचन श्री दिलीपरावजी सणगर पतसंस्थेचे असि. मॅनेजर मारुती शेंडे, श्री गहिनीनाथ दूध संस्थेचे मॅनेजर यशवंत डोणे व श्री गहिनीनाथ विकास सोसायटीचे सचिव महेश मगदूम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार समूहाचे संचालक सदानंद हेगडे यांनी मानले.
या प्रसंगी समूह संचालक राजेंद्र पसारे, मलेश स्वामी, महेश बोते, अमित हेगडे, संभाजी कोराणे, मंडळाचे प्रवीण सणगर, अथर्व सणगर, अभिनंदन करंजे, अश्विनी सणगर, लक्ष्मी कोंडीगरे, बाबासो पठाण, मॅनेजर कोमल सणगर यांच्यासह सर्व संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.