मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील  वंचित  लाभार्थ्यांना  ६६ कोटी ५७ लाखाचा  निधी मंजूर – माजी खासदार संजय मंडलिक

मुरगूड (शशी दरेकर) – मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्यातील अनुदानाअभावी प्रलंबीत असलेल्या  पात्र लाभार्थ्यांना  ६६ कोटी ५७ लाख रुपयाचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत मंजूर झाल्याची माहिती   माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी दिली.

Advertisements

     सातत्याने याप्रश्नी केलेल्या  पाठपुराव्यास यश आले असून २०२६-२७ सालासाठी पहिल्या टप्यातील हा निधीसाठी सातत्याने पाठपुरा केल्याचे समाधान  सांगत प्रा. मंडलिक यांनी  बाबत समाधान व्यक्त केले.

Advertisements

माजी खासदार ” प्रा. मंडलिक म्हणाले, “६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांना विविध आरोग्याच्या उपकरणांसाठी ६ फेब्रुवारी २०२४   च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविणेस मान्यता मिळाली.   या योजने अंतर्गत जेष्ठ नागरीकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या उपकरणासाठी तसेच वयोपरत्वे येणारे अपंगत्व यावर उपाय योजना करणेसाठी आवश्यक ती सहाय्य साधणे/उपकरणे खरेदी करणेसाठी व त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवणेसाठी शासानकडून पात्र लाभार्थ्यांना वर्षातून एक वेळ  तीन हजार इतक्या रकमेचा लाभ  देणेत येतो.

       सन २०२६-२७ साठी सदर योजनेखाली राज्यात एकूण १६६  कोटी ३० लाख रुपयाची  आर्थिक  तरतूद अर्थसंकल्पात करणेत आली आहे. आधार प्रमाणिकरण असलेल्या परंतू निधी अभावी प्रलंबीत असलेल्या राज्यातील एकूण २ लाख  २१ हजार ६२० पात्र लाभार्थ्यांना लाभ देणेसाठी एकूण रु. ६६  कोटी ५७ लाख इतकी रक्कम आदा करणेस दि.४ सप्टेंबर २०२६ च्या आदेशान्वये शासनाने मंजूरी दिली  आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४०  हजार लाभार्थ्याच्या बॅंक खात्यावर तीन हजाराची रक्कम जमा होणार असलेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगीतले. “

Advertisements

     प्रलंबीत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ  मिळणेसाठी आपण उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय सिरसाट यांचेकडे सातत्याने व समक्ष भेटून तसेच लेखी पत्राद्वारे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनाही रक्कम मंजूर करणेबाबत प्रयत्नशील असल्याची  ग्वाही माजी खासदार प्रा. मंडलिक यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!