सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट – अध्यक्ष नवीद मुश्रीफ

कारखान्याच्या १३ व्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात

बेलेवाडी काळम्मा, दि. २०: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण संयंत्राचा प्रारंभही करण्यात आला.

Advertisements

            भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, इजेक- ISJEC या नामांकित जगप्रसिद्ध कंपनीमार्फत कारखान्याच्या वाढीव गाळप क्षमतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने व वेळेत पूर्ण करावयाचे झाल्यास चाचणीच्या दृष्टीने कारखाना दहा ते पंधरा दिवस लवकर सुरू करावा लागेल.
                

Advertisements

उद्दिष्टे चालू हंगामाची……..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, चालू म्हणजेच सन २०२६-२७  या हंगामात अकरा लाख टन ऊस गाळपासह सहवीज निर्मिती प्रकल्पामधून एकूण ११ कोटी युनिट्स वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आठ कोटी युनिट्स वीज निर्यात करण्याचा संकल्प आहे. डिस्टलरीमधून रेक्टिफाईड स्पिरीट, इ. एन. ए. व इथेनॉल असे मिळून अडीच कोटी लिटर्स निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
              

कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा सुरक्षा…..!
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या एकूण १,२९५ कर्मचाऱ्यांना कारखान्याच्यावतीने आरोग्य विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कामगाराला दोन लाख  रुपयांची वैद्यकीय विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेच्या हप्त्याचा रू. ९८ लाख रुपयांचा धनादेश कारखाना प्रशासनाच्यावतीने एस. बी. आय. जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात आला.

Advertisements

यावेळी जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

error: Content is protected !!