भव्य बारा जोतिर्लिंग देखावा उद्या नागरीकानां पाहण्यासाठी खुला
मुरगूड ( शशी दरेकर ) : क्रीडा, सांस्कृतीक आणि सामाजिक बांधीलकीचा त्रिवेणी संगम साधत नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात भव्य व प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाने केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा धडाका लावला आहे. नवमहाराष्ट्र मंडळ प्राणित बाजारपेठेत भव्य गणेश मंदिर साकारल्याने हे आत्मरूप गणेश मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.


या मंदिराच्या गणेश जयंती, वर्धापनदिनानिमित्य दिंडी सोहळा, भजन, किर्तन, जन्मकाळ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होतो. यावेळी शिस्तबध्द पध्दतीने मोठया प्रमाणात भाविक-भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.
मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये अत्यंत देखणे आणि समाजप्रबोधन करणारे मोठे देखावे सादर केले जातात. या वेळी नवमहाष्ट्र क्रिडा मंडळाने सरपिराजी रोड (भाजीमंडई )येथे भव्य १२ जोतिर्लिंग देखावा पाहण्यासाठी रविवार दि .२० / ९ / २०२६ रोजी रात्री ८ वाजता खुला होणार आहे.
प्रतिवर्षी या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते.
या उत्सवाच्या पलीकडे जाऊन आरोग्य आणि सामाजिक कार्याचा वसा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने मंडळाकडून दरवर्षी विविध आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो रुग्णांना वेळेवर रक्त व वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होते.
अनाथ व गरजू घटकांना मदतीचा हातआपल्या उत्पन्नाचा आणि वेळेचा काही भाग समाजासाठी खर्च करून मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब व गरजू लोकांना तसेच अनाथ आश्रमात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते.
संकटकाळात धावून जाण्याची मंडळाची ही वृत्ती कौतुकास पात्र ठरली आहे.याशिवाय तरुण पिढीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देऊन नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाने इतर मंडळांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे सनी गवाणकर , अनिल मगदूम , सर्जेराव कुडवे , सुनिल गवाणकर , दिपक वारके , दिपक बहुधान्ये , प्रविण भारमल , शशिकांत सणगर , तुकाराम माने , संजय वारके , अरूण माने , प्रशांत हळदकर , अमोल मेटकर , संदिप कांबळे , सचिन बरकाळे , अमर खैरे , प्रदिप भोपळे , सूरज एकल ,
मुन्ना कटके , शुभम खैरे , प्रतिक खैरे , राहुल खैरे , योगेश बुरुड, संग्राम बुरुड , बबलू मगदूम , आकाश चव्हाण , रोहित भारमल , वैभव कुडवे l, सिद्दिक पटेल , सुरज भोई , शुभम डवरी , रोहित डवरी , अर्णव सणगर व मंडळाचे सभासद भव्य अशा देखाव्यासाठी परिश्रम घेत आहेत.