कागल ज्युनिअर राजघराण्यातील संयोगिताराजे घाटगे यांचे निधन

कागल : येथील ज्युनिअर कागलकर राजघराण्यातील संयोगिताराजे अजितसिंहराजे घाटगे (वय ९३) यांचे निधन झाले. येथील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागलचे अध्यक्ष मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या त्या आई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व अखिलेशराजे घाटगे यांच्या त्या आजी होत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी , आमदार संजय घाटगे, वीरेंद्रसिंह … Read more

राज्य साखर कारखाना संघाच्या संचालकपदी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदारसंघातून श्रीमती घाटगे यांची बिनविरोध निवड … Read more

जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर, दि. 10 : माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द … Read more

संकूचित अभिवृती संकूचित अस्मिताना जन्म देते – प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार

मुरगूड (शशी दरेकर) : संकूचित अभिवृती संकूचित अस्मिताना जन्म देते असे प्रतिपादन येथील मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले. मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी प्राचार्य डॉ. कुंभार ” व्यक्तिमत्व विकासाचे पैलू ” या विषयावर बोलत होते. महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. टी. एम. … Read more

वंचित घटकांसाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे एचआयव्ही /एड्स जनजागृतीचे समाजकार्य कौतुकास्पद : सपोनि चंद्रकांत शेडगे

स्थलांतरीत कामगाराच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी भेट मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजातील वंचित, उपेक्षित, समाजातील घटकाचे ऋण फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजामध्ये एचआयव्ही /एड्स जनजागृती करणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे समाज विधायक कार्य कौतुकासपद आहे. असे मत उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी व्यक्त केले. गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील युवा … Read more

दिंडी सोहळा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन

वारकरी साहित्य परिषद बैठक संपन्न मुरगूड ( शशी दरेकर ) : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त इचलकरंजी येथे शुक्रवारी (ता.११) होणाऱ्या भव्य दिंडी सोहळा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची बैठक नुकतीच वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव यादव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

कागल शहरामध्ये ‘भारत जोडो’ च्या समर्थनार्थ पदयात्रा

कागल, ता. ८ : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटनेतर्फे शहरात पदयात्रा काढण्यात आली. येथील शाहू उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सुरवात झाली. निपाणी वेशीतून मुख्य रस्यावरून पदयात्रा बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात … Read more

मुलग्याने बापास जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

कागल (विक्रांत कोरे) : प्रॉपर्टीची वाटणी देत नाहीस काय ?असे म्हणत, शिवीगाळ करीत मुलगा व सुनेने सासऱ्यास संडासात कोंडून घातले. दाराच्या फटीतून पेट्रोल आत फेकले व आग लावली आणि पेटवून दिले. प्रॉपर्टीच्या कारणावरून वडीलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना, कागल तालुक्यातील व्हन्नुर येथे सकाळी साडेसहा वाजता घडली. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे … Read more

सुळकूड योजनेविरोधात १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सुळकूड येथील बैठकीत निर्णय; हजारो शेतकरी सहभागी होणार सुळकूड : इचलकरंजी शहराच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मंजूर झालेली १६०.८४ कोटींची पाणीपुरवठा योजना रद्द व्हावी, या मागणीसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता दूधगंगा बचाव कृती समितीमार्फत मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात दूधगंगाकाठच्या सुळकूड, कसबा सांगाव, मौजे सांगाव, रणदिवेवाडी, लिंगनूर, … Read more

नियमित कर्जफेड करूनही प्रोत्सहानपर लाभापासून वंचीत

बाचणी परिसरातील शेतक-यांचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन व्हनाळी : सलग तीन वर्षे बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज नियमीत परतफेड केले असताना सुद्धा साके,व्हनाळी,केंबळी,बेलवळे, ता.कागल परिसरातील सुमारे 400 एवढ्या शेतक-यांना बॅंक आॅफ इंडिया च्या बाचणी शाखेतून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर 50 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली … Read more

error: Content is protected !!