03/12/2022
0 0
Read Time:3 Minute, 10 Second

कोल्हापूर, दि. 10 : माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022.

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. (गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत) मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत राहील.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!