राज्य साखर कारखाना संघाच्या संचालकपदी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisements

राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदारसंघातून श्रीमती घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. श्रीमती घाटगे सध्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या व सहकारी साखर कारखानदारीमध्ये आदर्श असलेल्या शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

Advertisements

विक्रमसिंह स्व. घाटगे यांनी देखील काही काळ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. अत्यंत मानाच्या अशा या शिखर संस्थेवर श्रीमती घाटगे यांची निवड झाल्याने शाहू ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!