मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव तालूका कागल येथील शाळकरी मुलगा सोमवारी दुपारी एक चे दरम्यान विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसाद रामचंद्र करडे वय १५ वर्षे असे मयताचे नाव असून सदर घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी प्रसाद त्याच्या मित्रांसोबत चिमगावच्या शिवारातील नारायण रामचंद्र वगदे यांच्या विहीरीत पोहण्यासाठी गेला होता . त्याने विहीरीत सुळकी उडी मारली. तो थेट विहीरीच्या तळाला गेला. फार वेळ पाण्यावर आला नाही. सोबतच्या मित्रानी आरडाओरडा केला तो पर्यंत त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले होते.
अमरदिप भगतसिंग एकल व आनंदा बाबू करडे या दोघानी प्रसाद याला विहीरीतून बाहेर काढून मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारापूर्वी प्रसाद मयत झाला असल्याचे तेथिल डॉक्टरनी सांगितले. त्याच्या मृत्यूमुळे चिमगांव गावात शोककळा पसरली आहे.