भाजपाचे महासंपर्क अभियान
कोल्हापूर दिनांक 24 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज असून दिनांक 26 एप्रिल रोजी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष असे सर्वच एकाच वेळी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत आपापल्या बूथ मध्ये मतदारांशी संपर्क साधून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तसेच दिल्लीत संजय मंडलिक यांना पाठवण्याचा निर्धार करून त्या दिवशी घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधणार आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये केलेली विविध विकास कामे सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवणे हा या महासंपर्क अभियानाचा उद्देश आहे.
देशाच्या भवितव्याचा विचार करून भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी मतदान करा असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी तपोवन मैदान या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा आहे.