मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे एकंदर कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय आहे .संघाच्या सदस्यांनी आपले उर्वरित आयुष्य हसत खेळत आनंददायी आरोग्यदायी व तान तनाव मुक्त व्यतीत करावे ज्येष्ठांना जर कौटुंबिक त्रास जाच् भीती असेल तर त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून व्यथा मांडाव्यात.
ज्येष्ठांच्या अडचणी व्यथा निवारण करण्याचे निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे ठाम आश्वासन श्री विकास बडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगुड पोलीस स्टेशन यांनी मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने दिनांक 30 मार्च 2022 रोजी संघाच्या विरंगुळा केंद्रात आयोजित ज्येष्ठांचे विविध कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिले.
प्रारंभी संचालक श्री एमटी सामंत यांनी मरण पावलेले सदस्य व अन्य नागरिक याबाबत शोक व्यक्त करून कार्यक्रमात स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली .संचालक श्री रणजीत सिंह सासणे यांनी पाहुण्यांना दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्याची विनंती केली.
त्यानंतर संचालक श्री जयवंत हावळ यांनी पाहुण्यांचे व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. संघाचे अध्यक्ष श्री गजाननराव गंगापुरे यांनी संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती देऊन संचालक व सदस्य यांच्या सहकार्यामुळेच संघाचे कार्य विविधांगी व गतिमान होत आहे असे स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री विकास बडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेवराव मेंडके (माजी नगराध्यक्ष ) प्रमुख उपस्थिती मध्ये श्री किरण गवाणकर माजी नगरसेवक यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन व-फेटे बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला 75 वर्षीय सदस्य श्री महादेव रावण श्री महादेव रेंदाळे श्री पांडुरंग चांदेकर श्री बळवंत डोंगरे श्री लक्ष्मण गोधडे श्री मोहन अणावकर श्री बाळकृष्ण वेरुळकर यांचा शाल श्रीफळ गांधी टोपी व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुणे श्री विकास बडवे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच संघाचे वयाने सर्वात ज्येष्ठ सदस्य श्री बळीराम डेळेकर श्री मारुती हासबे यांचा शाल श्रीफळ गांधी टोपी व गुलाब पुष्प देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तदनंतर संघाच्या 26 सदस्यांना ओळखपत्राचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर संघामार्फत घेण्यात आलेल्या एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धेचे विजेते यांना मान्यवरांच्या हस्ते -पारितोषिक देण्यात आली. संघाच्या सदस्यांची हैदराबाद विमान सहल यशस्वी करण्यामध्ये श्री अविनाश चौगुले श्री प्रवीण सूर्यवंशी श्री पी डी माने यांचे या कार्यक्रमात कौतुक करण्यात आले त्यानंतर प्रमुख उपस्थिती श्री किरण गवाणकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेव मेंडके यांनी मनोगत व्यक्त करून संघास शुभेच्छा दिल्या .
शेवटी आभार संघाचे संचालक श्री अशोक गवळी यांनी मानले तर सूत्रसंचालन संघाचे संचालक श्री पांडुरंग पाटील ( लेखक ) यांनी केले . सदर कार्यक्रमास दलित मित्र श्री . डी .डी. चौगुले संचालक श्री शिवाजीराव चौगुले सचिव श्री सखाराम सावर्डेकर खजिनदार श्री शिवाजी सातवेकर श्री सदाशिव एकल महादेव नागवेकर श्री मारुती जाधव , सिकंदर जमादार, गणपती शिरसेकर ,विनायक हावळ, अशोक पाटील ,मधुकर येरुडकर, आदी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते .संघाचे सदस्य व बाजारपेठेतील व्यापरी -श्री चंद्रकांत दरेकर यांनी उपस्थितांना चहा व बिस्किट देऊन जेष्ठ नागरिक संघावरील आपले प्रेम व्यक्त केले .