मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी व सर्वांच्या परिचयाची असलेली श्री .लक्ष्मीनारायण नागरी सह .पतसंस्थेला बेळगांव येथिल ग्रामिण विकास फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ” आदर्श संस्था पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामिण अर्थकारणात आदर्श कार्याचा ठसा उमवल्याबद्दल देण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चिक्कोडी (जि. बेळगांव) येथिल घट्टी फार्म हाऊस येथे माजी केंदिय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते व बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, बेळगांव जिल्हा, माजी होमगार्ड निदेशक अरविंद घट्टी व कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा “आदर्श संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन श्री लक्ष्मीनारायण सह. पतसस्थेला-सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे सभापती श्री. पुंडलिक डाफळे, उपसभापती श्री. रविंद्र खराडे, संचालक श्री जवाहर शहा, अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट, किशोर पोतदार, विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे (सर) व कार्यकारी संचालक नवनाथ डवरी यानीं हा ” आदर्श संस्था पुरस्कार ” स्विकारला.
गेली ५५ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यरत श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेला ऑडीटवर्ग ” अ ” प्राप्त झाला असून फेबुवारी २०२२ अखेर संस्थेला २ कोटी १६ लाख इतका भरघोस नफा झाला आहे . या संस्थेने ६२ कोटी ८८ लाख ठेवीतून ४६ कोटी ६ लाख इतके कर्ज वितरण केले आहे .थकबाकी५२९६६रु इतकी आहे तर एन. पी. ए. चे प्रमाण १ टक्का आहे.
या संस्थेच्या पारदर्शक कारभाराचा शासकिय स्तरावर नोंद घेऊनच हा ” आंतराज्य आदर्श संस्था ” पुरस्कारासाठी या श्री. लक्षीनारायण पतसंस्थेची निवड करण्यात आल्याचे आयोजकानी यावेळी सांगितले. हा पुरस्कार मिळालयाबद्दल मुरगूड येथिल श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेच्या चेअरमन व सर्व संचालकानी लक्ष्मीनारायण .पतसंस्थेला भेट देऊन चेअरमन, व्हा . चेअरमन व संचालक मंडळाचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.