संपादकीय

काळाच्या कसोटीला उतरलेले वृत्तपत्र “साप्ता. गहिनीनाथ समाचार”

ब्रिटीश संसदपटू एडमंड बुर्के यांनी ब्रिटिश संसदेत १७८७ साली एका भाषणात वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे. लोकशाही राज्यरचनेतविधिमंडळ, न्यायमंडळ व प्रशासन या तीन प्रमुख स्तंभानंतर निष्पक्ष व निर्भीडअसा वृत्तपत्र हा चौथा स्तंभ मानला गेला आहे. लोकशाही वृत्तपत्रेही “वॉचडॉग”(watch dog) ची भूमिका निभावत असतात. म्हणजेच देशाच्या राजकारणात वृत्तपत्र माध्यमे ही नेहमीविरोधी बाकावर बसलेली असतात. वृत्तपत्रे लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारीयांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून त्यांना योग्य रितीने देशाचा कारभारचालवण्यात बाध्य करीत असतात.

भारतीय स्वातंत्र्य काळातवृत्तपत्रांनी कमालीची भूमिका निभावली होती. यावेळी भारतीय समाज जरी मोठ्याप्रमाणात अशिक्षित असला तरी वृत्तपत्रांनी लोकांमध्ये स्वराज्य वस्वातंत्र्याची भावना जागृत केली हे नाकारता येणार नाही. लाला लजपत राययांचे पंजाबी, अरविंद घोष यांचे वंदे मातरम, लोकमान्य टिळकांचेकेसरी व मराठा,महात्मा गांधींचे हरिजन, यंग इंडिया, नवजीवन, मिरजकर व जोगळेकरयांचे क्रांती, श्यामजी कृष्ण वर्मा यांचे इंडियन सोशालिस्ट आदी वृत्तपत्रे स्वातंत्र्यचळवळीत आघाडीवर होती. या वृत्तपत्रांना दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन ब्रिटिशशासनाने केला. पण प्रसंगी लपूनछपून ही वृत्तपत्रे सातत्याने प्रकाशित होतराहिली.

त्याचबरोबर भारतातील अनिष्ट जातिप्रथा व रूढीपरंपरा या विरोधात भारतीय आद्य समाजसुधारक राजाराम मोहन राय यांनी संवादकौमुदी,मीरात उल अखबार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, प्रबुद्धभारत मधून आसूड ओढले.

महाराष्ट्राचेही वृत्तपत्र चळवळीत मोठेयोगदान राहिले आहे.ज्यांना भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे जनक मानले जाते ते‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रीय आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातमहाराष्‍ट्रीय वृत्तपत्रांनी समाजवादी विचारांचा वसा घेतला. यामध्येसत्यशोधक समाजाचा वाचकवर्ग आघाडीवर होता. महात्मा ज्योतिबा फुले, नारायणमेघाजी, गणपतराव पाटील, शामराव देसाई, प्रबोधनकार ठाकरे, ग.गो.जाधव, ना.भी.परुळेकर यांचे वृत्तपत्रसृष्टीत मोठे योगदान राहिले आहे. छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रेरणेने सन 1921 साआली ‘राष्ट्रवीर’ हे साप्ताहिक सुरू झालेजे आजही प्रकाशित होते.

कागलमध्ये 1935 ताली डॉ.डी.ए.घाटगे यांनी ‘नवजीवन’ हे साप्ताहिक सुरु केले. वाय.डी.माने (आण्णा ) यांनी‘कागल समाचार’ नावाने साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर १०सप्टेंबर १९९९ सालीदिलीपराव सणगर यांनी “साप्ताहिक गहीनीनाथ समाचार” ची मुहूर्तमेढ रोवली.जे आजहीखंबीरपणे सुरू आहे. कागलमधील अनेक लहानसहान वृत्तपत्रांनी नेहमीच पुरोगामी वसत्यशोधकी विचारांची कास धरली आहे.यामध्ये गहीनीनाथ समाचारआघाडीवर राहिले आहे. यावृत्तपत्रातून अनेक  उपसंपादक व पत्रकार  प्रशिक्षण घेऊन इतर दैनिके व न्यूज चॅनेल्समध्ये आजही कार्यरत आहेत.

वृत्तपत्रेलोकांनाआवडतात. पण तीचालवण्यासाठी मात्र वृत्तपत्र मालकाला आर्थिक कसरत करावी लागते. वृत्तपत्र हे असे उत्पादन आहे की जे आपल्यानिर्मितीमूल्यापेक्षा कमी मुल्याने विकले जाते. त्यामुळे जाहिराती हावृत्तपत्राचा श्वास मानाला जातो. याचा फायदा अनेकदा राजकारणी व गुन्हेगारवृत्तीचे लोक घेतात. ते जाहिराती देऊन वृत्तपत्रांना आपली बटिक बनवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ध्येयवादी वृत्तपत्रांची घुसमट होते. आपली मुल्ये सांभाळायची की आर्थिक बाजू या विवेचनातून अनेक वृत्तपत्रे बंद पडतात.

गेल्या वर्षी महाराष्ट्राने महापुराचा तडाखाअनुभवला तर यावर्षी मानवनिर्मित कोरोना  रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे. यासंकटकाळात महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटली आहे.याकाळात अनेकवृत्तपत्रांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली तसेच पगार अर्ध्यावर आणलेआहेत.वृत्तपत्रांच्या पानांची संख्या कमी केलीआहे.बाजारपेठेची अवस्था खराब आहे. वृत्तपत्र कागदाच्या किमती वाढतच आहेत. छपाई खर्च परवडेनासा झालाआहे. अशा काळात साप्ताहिक गहिनीनाथ समाचार आपल्या खंबीर पायावर वाटचालकरीत आहे याचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.

वृत्तपत्रव्यवसायामध्ये बातमीदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बातमीदार हावृत्तपत्राचे डोळे व कान म्हणून काम करत असतो. कोरोना साथीच्या काळात जीवावरउदार होऊन समाचारच्या पत्रकारांनी वृत्तांकन केले. कारण वाचकांचा सत्यजाणण्याचा अधिकार आम्हाला प्रिय आहे.

आज आपल्या साप्ताहिकगहिनीनाथ समाचार २२व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वाटचालीत संस्थापकस्व.दिलीपराव सणगर व स्व. रवींद्र सणगर यांचे आशीर्वाद सततपाठीशी राहिले आहेत. तसेच आमचे अतिथी संपादक दलित मित्र एस.आर.बाईत सर यांचे मार्गदर्शन व योगदान अमूल्य आहे. त्याप्रमाणे पत्रकार बंधुआण्णापा मगदूम,शिवाजी फडतारे,रवींद्र पाटील, शशी दरेकर,जहांगीर शेख, कृष्णात कोरे,विक्रांत कोरे,तानाजी सोनाळकर,सुरज गवाणकर,सागरलोहार, सुहास घोदे, शकील तासीलदार, उपसंपादक शैलेश कांबळे, हितचिंतक अशोक केसरकर, आप्पासाहेबजकाते-यादव, उदय काटकर, बाळासो बोधले, मारुती पाटील, बाळासो रांगोळे, शामरावपाटील, मजीत पटेल व कर्मचारी यशवंत ढोणे, मारुती शेंडे, सुवर्णा कचरे,महेश मगदूम, भिकाजीबन्ने यासर्वांचे मोलाचे सहकार्य सतत लाभत आहे याबद्दल त्यांचे शतशः आभार. या कार्यात सणगर कुटुंबातील सम्राट सणगर यांचे बंधू अमर व सुमित आणि त्यांच्या कुटुंबीयांचे योगदानही महत्त्वाचे आहे.

शेवटीकोव्हीड-१९रोगाशी मुकाबला करण्यासाठी रात्रंदिवस आपल्या कुटुंबापासून दूर रहात आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर,परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचेआम्हीनेहमीच ऋणी राहू….

  • प्रियदर्शन पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *