27/09/2022
0 0
Read Time:1 Minute, 11 Second

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल” वाचनालयात स्व . विजयमाला मंडलीक ( वहीनी ) यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले . प्रथम स्व . विजयमाला मंडलीक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा सौ . शुभांगी किरण गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून कै . मंडलीक वहीनीनां श्रध्दांजली वाहण्यात आली . यावेळी माजी नगराध्यक्षा सौ . शुभांगी गवाणकर यानीं त्यांच्या आठवणीनां उजाळा दिला.

यावेळी शिवाजी चौगले (सर ) , माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक किरण गवाणकर , संदीप वरपे, ग्रंथपाल सौ .भारमल,वाहिनी, कु . शुभांगी कलकुटकी, वाचनालयाचे कर्मचारी व वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!