बातमी

विद्यामंदिर सोनगे येथिल विद्यार्थ्यानीं राबवली रायगडावर स्वच्छता मोहिम

मुरगूड ( शशी दरेकर ) : आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही . स्वच्छ परिसर , स्वच्छ हवा , पाणी , वातावरण कोणाला नकोसे असते . स्वच्छतेने रोगराई नाहीसे होते. अशा चांगल्या सवयीचा सर्वांच्या जीवनावर खूप परिणाम होतो.

माझा भारत, स्वच्छ भारत हा संदेश प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यानीं शैक्षणिक सहलीमध्ये स्वच्छता मोहिम राबविली .
विद्यामंदिर सोनगे ता . कागल या शाळेची शैक्षणिक सहल महाबळेश्वर , प्रतापगड व रायगड येथे गेली होती .सहलीमध्ये इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यानीं सहभाग घेतला होता .

अनेकजण फोटोसाठी , सेल्पी काढण्यासाठी , मौजमजा करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येतात . पण , सोनगे येथिल विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यानी रायगड किल्यावर पडलेल्या पाण्याचा बाटल्या, खाऊचे पाऊच, प्लॅस्टिक पिशव्या, तुटलेल्या चपला व पडलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून ऐतिहासिक रायगड किल्याची सहलीचा आनंद घेत स्वच्छता करुन एक वेगळाच आदर्श तरुणांच्या समोर ठेवला आहे . सोनगे शाळेच्या चिमुकल्यानीं राबवलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे .

या विद्यार्थ्यानां पर्यावरणप्रेमी शिक्षक श्री . हरिश्चंद्र साळोखे , भाऊ कुंभार , संदिप शिंदे , के.व्ही. पाटील , सौ . सुनिता पाटील , या शिक्षकांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . मंगल भोई , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.

पर्यावरण शिक्षक श्री . हरिश्चन्द्र साळोखे हे चारपाच वर्षातून एकदा रायगड सहलीचे आयोजन करुन रायगड स्वच्छता मोहिम राबवितात . त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव , प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदीच्या अगोदर २०१२पासून कापडी पिशव्या मोफत वाटप करतात . आतापर्यंत त्यानीं दहा हजारापेक्षा जास्त पर्यावरण संदेश छापलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *